बुलंद समाज

LightBlog

Breaking

Sunday 15 April 2018

April 15, 2018

अजिंठ्यातील आदर्श शिक्षिका सरला कामे कुमावत कला रत्न पुरस्काराने सम्मानित

अजिंठ्यातील आदर्श शिक्षिका सरला कामे कुमावत कला रत्न  पुरस्काराने सम्मानित
.
.  सरला कामे कुमावत या शिक्षिकाला मिळाला होता राज्याचा सावित्री बाई आदर्श पुरस्कार ही

अजिंठा येथील शिक्षिका तथा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त सरला कामे कुमावत यांना कला रत्न पुरस्काराने समाणित करण्यात आला. छाया मुनीर पठाण

मुनीर पठाण

प्रतिनिधी।अजिंठा दि 1 4.. येथील जि. प.प्रशाला येथील आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त शिक्षिका सरला कामे कुमावत याना कला रत्न पुरस्काराने समानित करण्यात आला.
महात्मा ज्योतिराव फुले जयंती निमित्त श्रीमती सरला कामे कुमावत यांना राज्यस्तरीय नागरी रत्न पुरस्कार २०१८ कला रत्न या पुरस्काराने औरंगाबाद येथे  समानित  करण्यात आला. सरला कामे ही अजिंठयातील जि. प.प्रशाळेतील शिक्षिका आहेत. जगत गुरू तुकाराम नाट्य गृह सिडको औरंगाबाद येथे हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात आ. जयंत भाई पाटील, ब्रिगेडियर सुधीर सावंत, मा. खा. उत्तमसिंग पवार आम आदमीच्या राष्ट्रीय नेत्या प्रीती मेनन यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार  प्रदान करण्यात आले. श्रीमती सरला कामे कुमावत हे गेल्या अनेक वर्षांपासून स्त्री भ्रूण हत्या व मुलीवर होणाऱ्या अत्याचार या विषयाच्या जनजागरण, आपल्या प्रभावशाली व्याख्यान, पोस्टर्स, प्रदर्शन बोलक्या बाहुल्याच्या माध्यमातून करीत आहेत. मुलींना शाळेत जाऊन स्वरक्षणासाठी  टिप्स देऊन समाजात आत्मविश्वासाने वावरण्यात प्रेरित करतात. तसेच बोलक्या बाहुल्याच्या माध्यमातून भारत स्वच्छ अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन व एड्स जनजागृती करीत असल्याने त्याना कला रत्न  हा पुरस्काराने समानित करण्यात आले. त्यांना महाराष्ट्र शासनाचा थोर समाजसेविका सावित्री बाई फुले राज्य आदर्श शिक्षका हा समानाचा पुरस्कार ही प्रदान केला गेला. त्यांना या कार्यासाठी त्यांचे पती अशोक कुमावत नेहमी मदत व मार्गदर्शन करीत असतात. या पुरस्कार प्रसंगी राजन क्षीरसागर, अड गजानन कदम, व्यंकटराव जाधव, बाळासाहेब गरुड, रजनी नागवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. कला रत्न पुरस्कार मिळताच अजिंठा जि. प.प्रशाला येथील मुख्याध्यापक आर. भिरुड, शिक्षक शेख बशीर यांनी कामे मॅडम शाळेची आन, बान शान आहे असे व्यक्तव्य करून त्यांचा सत्कार व करण्यात आला. यावेळी हरिश्चंद्र गव्हाणे, दिलीप ढगे, सुनीता सोनवणे, वंगल, मिलिंद, देशमुख, उबाळे, भोपळे आदी उपस्थित होते.  सावित्री बाई चा वारसा पुढे नेत आहे. ..
मी सावित्री बाई फुलेंचा वारसा पुढे नेत आहे. मी सावित्री आहे तर माझे पती ज्योतिबा अशोक कुमावत आहे. त्यांनीच मला अशा सत्कर्म व सामाजिक उपयोगी कार्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन देऊन कार्यास निस्वार्थ सेवेची शिकवण दिली आहेत. यामुळे पुढेही सामाजिक काम करायचे आहेत.      ....सरला कामे कुमावत, शिक्षिका

अजिंठ्यातील आदर्श शिक्षिका सरला कामे कुमावत कला रत्न पुरस्काराने सम्मानित

अजिंठ्यातील आदर्श शिक्षिका सरला कामे कुमावत कला रत्न  पुरस्काराने सम्मानित . .  सरला कामे कुमावत या शिक्षिकाला मिळाला होता राज्याचा सावित...